२६ जानेवारीची गांवसभा ऑफलाईन घ्यावी
ग्रा.पं.सदस्य सुकूमार पाटील यांची मागणी
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये गेल्या चार वर्षातील विकास कामाचा लेखाजोखा तसेच मंजूर झालेले नविन कामे तसेच झालेल्या खर्चाला व होणाऱ्या खर्चाला गांव सभेची मंजूरी घेणे गरजेचे असते, त्यामुळे २६ जानेवारी रोजी होणारी गांवसभा ऑनलाईन पध्दतीने न घेता ऑफलाईन पध्दतीने घेण्यात यावी, अशी मागणी हेरवाड ग्रामपंचायतीचे सदस्य सुकूमार पाटील यांनी केली आहे.
गेल्या चार वर्षात गावात विविध विकास कामे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली आहेत. यामध्ये शासनाकडून येणारा निधी व त्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच शासनाकडून येणारा निधी कुठे खर्च करावा, व गावातील समस्या जाणून घेण्यासाठी ऑफलाईन गांवसभा होणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना परिस्थितीमुळे गांवसभा झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने सुरु असलेले काम तसेच विकास कामे व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ऑफलाईन गांवसभा होणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा काळ थोडा कमी झाला असून शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सदरची गांवसभा ऑफलाईन पध्दतीने घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही सुकूमार पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा