ज्येष्ठ पत्रकार दगडू माने आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 येथील स्पीड न्यूज-24 चॅनेल तर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार दगडू माने (दै पुण्यनगरी) यांना 'आदर्श पत्रकार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी वृत्तपत्र व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पत्रकारांना मौलिक मार्गदर्शन केले, कोल्हापूर येथील विश्वेश्वरय्या सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपत गायकवाड होते.

          यावेळी विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ संभाजी खराट, शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता व जनसंवाद विभाग प्रमुख प्रा डॉ निशा पवार व पुण्यनगरीचे वृत्तसंपादक राजेंद्रकुमार चौगुले यांच्या हस्ते कोल्हापुरी फेटा ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दगडू माने यांचा गौरव करण्यात आला.

          शिरोळ येथील दगडू माने हे वृत्तपत्र क्षेत्रात 29 वर्षे कार्यरत आहेत, सामाजिक ,कृषी, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध विषयावरील लेखनाबरोबरच शोध पत्रकारिता त्यांनी जोपासली आहे, महापूर व कोरोना नैसर्गिक आपत्ती काळात सामाजिक बांधिलकी म्हणून सामान्य गोरगरीब निराधारांच्या मदतीबरोबरच पुण्यनगरी वृत्तपत्रातून न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकार श्री माने यांनी केला आहे, पत्रकारितेच्या विशेष लेखनाबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र के अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने यापूर्वी श्री माने यांचा सन्मान झाला आहे.

          या पुरस्कार वितरण समारंभास निवृत्त सहाय्यक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड , कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ संजय पवार -वाईकर, साईराम भक्त सामाजिक कार्यकर्ते बाबूभाई मुगडे, विनायक कुलकर्णी, प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे कार्याध्यक्ष डॉ अजित देसाई , प्रांत ग्राहक संरक्षण समितीच्या महिला प्रदेशाध्यक्ष जहिदा मुजावर, डॉ अफजल देवळेकर -सरकार, स्पीड न्यूज-24 चे संपादक सुहास पाटील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दैनिकांचे पत्रकार उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष