कुरुंदवाडात पॉलिसच्या बहाण्याने तीन तोळे सोने लंपास ; दोन संशयित भामटे सीसीटीव्हीत कैद
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील आंबी गल्लीतील पितळी भांडी, देव घरातील मूर्ती पॉलीस करून देतो असे सांगून घरात शिरून भांडी पॉलीस करून झाल्यावर दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने आलेल्या संशयित दोन भमट्यानी तीन तोळे सोन्याच्या दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली या चोरीत आणखीन दोघेजण घराबाहेर रस्त्यावर उभे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले. आहे. सीसीटीव्ही कॅमेरामुळे तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजणेच्या सुमारास कुरुंदवाड येथील आंबी गल्ली येथे अंदाजे 35 वर्षे वयाचे दोन अनोळखी भामट्यानी करत पितळी भांडी व देवाऱ्यातील पितळी देवमूर्ती पॉलिश करून देतो असे सांगून सदर वस्तू पॉलिश करून देत विश्वास संपादन केले. व यावेळी एका घरातील महिलेच्या हातातील 5 तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या पाहून 2 भामट्यानी या बांगड्या काळपट झाल्या आहेत. यांनाही पॉलिश करून देतो असे सांगून जबरदस्तीने बांगड्या काढून घेतल्या. बांगड्यांना पॉलिश करून परत देत आपला मोबदला घेऊन पसार झाले. काही वेळाने त्यांचा महिलेचा मुलगा घरी आल्यानंतर भांडी-देव मूर्ती आणि सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून घेतल्याचे संबंधित महिलेने यांनी सांगितले असता. मुलाला संशय आल्याने त्यांनी शहरातील सोनाराकडे वजन करून तपासणी केली असता. बांगड्यामध्ये दोनच तोळे सोने असून तीन तोळे सोने लंपास झाल्याचे निदर्शनास आले.यानंतर संबधित महिलेच्या कुटुंबीयांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखीन दोघे असल्याचे पुढे आले आहे. याबाबत रात्री उशीरा पर्यत पोलिसात फिर्याद नोंद करण्याचे काम सुरू होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा