हेरवाडमध्ये १०० वर्षे वयाच्या आजीला ध्वजारोहणाचा मान
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सुरगोंडा पाटील व उपसरपंच विकास माळी यांनी हेरवाड गांवचे स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळगोंडा पाटील यांच्या पत्नी श्रीमंती पाटील यांना ध्वजारोहणाचा मान देवून स्वातंत्र सैनिकांच्या प्रती हेरवाड ग्रामपंचायतीने त्यांना मान मिळवून दिला आहे. सदरच्या आजींना नुकतेच १०० वर्षे पूर्ण झाले असून त्या गावातील सर्वात जेष्ठ महिला आहेत. त्यांना ध्वजारोहणाचा मान दिल्याने या उपक्रमाचे हेरवाड गावातून कौतुक होत आहे.
हेरवाड येथे २६ जानेवारीनिमित्त ग्रामपंचायती पटांगणात प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुरगोंडा पाटील यांना ध्वजारोहणाचा मान असताना देखील त्यांनी गावातील वयाने जेष्ठ असलेल्या तसेच स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळगोंडा पाटील यांच्या पत्नी श्रीमंती पाटील यांना ध्वजारोहणाचा मान देवून एक आदर्श निर्माण केला आहे. यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, उपसरपंच विकास माळी, आर.बी. पाटील, दादासो पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा