हेरवाडच्या गांवसभेत ऑनलाईन 'गोंधळ'
कोरम अभावी सभा तहकुब ; ३ फेब्रुवारी रोजी होणार सभा
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
नेटवर्कची समस्या, अनेक ग्रामस्थ अनम्युट, शासकीय अधिकार्यांची अनुपस्थिती व कोरम चा अभाव यामुळे हेरवाड ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सभेत प्रचंड गोंधळ पहायला मिळाला, अखेर कोरम अभावी सदरची गांवसभा तहकुब करून ३ फेब्रुवारी रोजी पुन्हा ऑनलाईन सभा होणार असल्याची घोषणा सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे हेरवाड ग्रामपंचायतीची २६ जानेवारीची गांवसभा ऑनलाईन घेण्याचे आदेश होते, या आदेशानुसार ग्रामपंचायतीने ऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, अनेक ग्रामस्थांना ऑनलाईन सभेत सहभागी होता येत नाही, ग्रामपंचायतीचा जमा - खर्च व पुढील करण्यात येणारा खर्च ग्रामस्थांच्या समोर मांडणे गरजेचे असते त्यामुळे सदरची सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील यांनी केली होती, त्यांची ही मागणी रास्त असल्याची चर्चा यावेळी काही ग्रामस्थांनी केली.
दरम्यान नेटवर्कची समस्या, अनेक ग्रामस्थ अनम्युट, शासकीय अधिकार्यांची अनुपस्थिती व कोरम अभावी सदरची गांवसभा अखेर रद्द करण्यात आली व ३ फेब्रुवारी रोजी सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सरपंच सुरगोंडा पाटील व ग्रामविकास अधिकारी पी.आर. कोळेकर यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा