धुळोबा पावला...! विजय पाटील यांनी पुर्ण केले नवस
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास पॅनलचे नगरपंचायत निवडणुकीत एक हाती सत्ता यावी यासाठी उत्तम पाटील गटाचे कट्टर कार्यकर्ते विजय सिदगोंडा पाटील यांनी नवस बोलले होते.बोलल्या प्रमाणे श्रीक्षेत्र धुळोबा येथे पायी चालत जाऊन आपला नवस पूर्ण केला आहे.
विजय पाटील हे गावात वेल्डिंग काम करतात. गेले अनेक दशकापासून पाटील घराण्याशी ते एकनिष्ठ आहेत. प्रत्येक सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेणाऱ्या विजय पाटील हे शेतकरी कुटुंबातील एक सर्वसामान्य नागरिक आहेत. नगरपंचायत निवडणुकीत उत्तम पाटील व कुटुंबाने घेतलेले परिश्रम पाहत त्यांनीही श्री क्षेत्र धुळोबा येथे नवस मागितला होता .एक हाती सत्ता आल्यास आपण बोरगाव हून श्रीक्षेत्र धुळोबा पर्यंत पायी चालत येतो असे नवस बोलले होते .बोलल्याप्रमाणे त्यांनी बोरगाव होऊन धुळोबा येथे सुमारे 40 किलोमीटर पायी चालत जाऊन आपला नवस पूर्ण केला आहे .त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. नवस पूर्ण केल्यानंतर उद्योगपती अभिनंदन पाटील यांनी त्यांचा सत्कार केला व आपल्या कुटुंबावर असच प्रेम राहू दे अशी अपेक्षा व्यक्त केले.
याप्रसंगी राजू बागे ,सिद्धगोंडा पाटील, बाबू हांजे,वीरकुमार पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा