आदित्य ठाकरेंच्या बंगल्याला रायगड नांव ; मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर


शिवार न्यूज नेटवर्क :

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलं आहे. राज्यातील सर्वच दुकानात मराठी भाषेत फलक लावण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांची नावसुद्धा बदलली जात आहेत.

राज्य मंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या बंगल्यांना आता गड आणि किल्यांची नावं देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले गड-किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. या संदर्भात त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतीम मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवास्थानांचं नामांतरण करण्यात आलं आहे.

यामध्ये मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू या नावावे ओळखला जाणार असून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड या नावाने संबोधले जाणार आहे. शिवप्रेमींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावाला सकारात्मक पाठपुरावा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असं नामांतर करण्यात आलं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष