दत्तवाड येथील ह.भ.प. रत्नाबाई पोवाडी यांचे निधन
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क
दत्तवाड (तालुका शिरोळ) येथील हरी भक्त परायण रत्नाबाई रामू पोवाडी यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. रत्नाबाई
पोवाडी या मन-मिळावू व्यक्तिमत्वाच्या होत्या. त्या आपल्या आयुष्यातील ४० वर्षे पंढरीची कार्तिकी वारी चालत पूर्ण केल्या होत्या. ज्ञानदेवच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचपद्धतीने पायी चालत जाणाऱ्या कार्तिकी वारीची परंपरा त्याने अखंड चाळीस वर्षे त्यांनी पूर्ण केली. जात-पात बाजूला ठेवून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना एकत्रित करून त्या पंढरीची वारी करीत होत्या. त्यांनी हरिभक्त परायणाची सर्व परंपरा शेवटपर्यंत त्यांनी जपली. कार्तिकी वारी बरोबरच गोरगरिबांना दानधर्म करण्याची त्यांना खूप आवड होती. त्यांच्या अकस्मिक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन नातू, दोन नाती व दोन नातसुना असा मोठा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा