सैनिक टाकळीत चक्क अर्धा एकर गांजाची शेती ; कुरुंदवाड पोलिसांची कारवाई


 कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीच्या हद्दीत उसाच्या शेतात एका शेतकऱ्याने आपल्या अर्धा एकर शेतामध्ये ऊसाबरोबर गांजा लावल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपी सदाशिव आप्पासाहेब कोळी (वय ५२) याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४९० गांजाची झाडे, ५ किलो तयार गांजा आणि पुड्या असा लाखों रुपयाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी सदाशिव कोळी याच्या घरावर छापा टाकला असता विक्री करण्याच्या उद्देशाने सुका तयार गांजाच्या कागदाच्या पुड्या आणि ५ किलो सुका गांजा घराच्या आडोश्याला मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून पोलिसांनी याबाबत कसून चौकशी सुरू केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष