हेरवाड वि.का.स. सेवा संस्थेच्या 13 जागांसाठी चौथ्या दिवशी २४ अर्ज दाखल

 २० मार्च रोजी होणार निवडणूक


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकुण १३ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकुण २४ अर्ज दाखल झाले आहेत. उद्या शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 

हेरवाड विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत १४ अर्ज दाखल करण्यात आले होते. यानंतर अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १० अर्ज दाखल झाल्यामुळे १३ जागांसाठी २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या शुक्रवार दिनांक 18 रोजी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी छाननी होणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च हा कालावधी असणार आहे. अर्ज माघारीनंतर ९ मार्च रोजी चिन्हांचे वाटप व २० रोजी मतदान होणार आहे. दरम्यान अनेक वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र १३ जागांसाठी अर्जांची संख्या वाढल्याने या संस्थेची निवडणूक लागण्याची शक्यता असली तरी माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष