उदगांवमध्ये 3 लाख 73 हजार रुपयाच्या तांबे धातूची चोरी ; एकावर गुन्हा दाखल

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

उदगांव हद्दीतील अकिवाटे इंडस्ट्रीजमधील रणजित कुलकर्णी यांच्या मालकीच्या कारखान्यातून 3 लाख 73 हजार 500 रुपयांची 498 किलो तांबे धातू चोरट्यांची चोरुन नेल्या प्रकरणी योगेश ईश्वरा पाटील रा उदगांव, निकम मळा याच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, उदगांव येथील अकिवाटे इंडस्ट्रीजमधील रणजित कुलकर्णी यांच्या मालकीचा कारखाना आहे. 1 ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यान संशयित योगेश पाटील याने कारखान्यातील 3 लाख 73 हजार 500 रुपयांची 498 किलो तांबे धातू चोरुन नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या घटनेची फिर्याद संतोष शिवाप्पा चौगुले यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष