चिंचवाड उपसरपंचासह 6 सदस्यांचा राजीनामा मंजूर


 राहूल डोंगरे / अर्जुनवाड :

चिंचवाड (ता. शिरोळ ) येथील उपसरपंचासह पाच सदस्य आणि पंधरा दिवसापूर्वी सरपंचाकडे सरपंच यांच्याकडे राजीनामा दिला होता. याबाबत आज बुधवारी ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगमध्ये सरपंचानी अवलोकन करून पुढील कार्यवाहीला मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी ग्रामसेविका कटारे होते.

पंधरा दिवसापूर्वी सरपंच यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपसरपंचासह सहा सदस्यांनी राजीनामा दिला होता. या राजीनामावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसापूर्वी मासिक सभा घेण्यात आली. ती मासिक सभा तहकूब झाल्यानंतर आज बुधवारी पुन्हा मासिक सभा घेऊन सरपंच ज्योती काटकर यांनी राजीनाम्याचे वाचन करून अवलोकन केले. गेल्या पंधरा दिवसापासून राजीनामा माघारी बाबत चर्चा होत आहे. उपसरपंच व सदस्यांना राजीनामा माघारी बाबतअनेक वेळा विचारले असून यावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे नाईलाजास्तव पुढील कार्यवाही करावी लागत असल्याचे सरपंच काटकर यांनी सांगितले. यामध्ये उपसरपंच सचिन पाटोळे, ग्रा.पं.सदस्य परमानंद उदगांवे, संदीप पाटोळे, कांचन ठोमके, सरिता गोधडे, भारती सुतार यांचा राजीनामा झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रोसिडिंग पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, सरपंच यांच्यावर उपसरपंच यांच्यासह सदस्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी राजीनामा न दिल्याने सदस्यांनी राजीनामा दिल्याचे समजते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष