जयसिंगपुर बसस्थानक विस्तारीकरणासाठी २ कोटीचा निधी मंजूर

 आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली माहिती



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

नव्याने बांधण्यात येत असलेल्या जयसिंगपूर बसस्थानकाच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी आणखी दोन कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,

सांगली कोल्हापूर महामार्गावर जयसिंगपूर येथे असलेले जयसिंगपूर चे बसस्थानक काही वर्षापासून नव्याने बांधण्यात येत होते, त्या वेळी मंजूर झालेल्या निधीतून बस स्थानकाच्या इमारतीचा काही भाग पूर्ण झाला होता पण बसस्थानका साठी असलेली एकूण जागा व अपुरे बांधकाम यामुळे या बसस्थानकाच्या इमारतीचे विस्तारीकरण होण्यासाठी आणखी दोन कोटीचा निधी मंजूर व्हावा अशी मागणी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी 20 नोव्हेंबर 2020 रोजी परिवहन मंत्री नामदार अनिल परब यांनी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटी वेळी त्यांच्याकडे केली होती, याचाच भाग म्हणून 2021 - 22 मधील शासनाच्या विशेष योजनेतून प्रस्तावित केलेल्या कामांना फेब्रुवारी 2022 मध्ये मंजुरी मिळाली असून राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलेल्या मागणीप्रमाणे जयसिंगपूर बसस्थानकाच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी आणखी दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे नव्याने मंजूर झालेल्या निधीमधून दहा फलाटासह बसस्थानकाच्या अपुऱ्या इमारतीचे विस्तारीकरण, बसस्थानक परिसरात 19 व्यापारी संकुल गाळे त्याचप्रमाणे बसस्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे, लवकरच जयसिंगपूर बस स्थानकाची विस्तारीकरणासह संपूर्ण इमारत पूर्ण होईल असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे हा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परिवहन मंत्री अनिल परब तसेच परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्यामुळे राज्यमंत्री यड्रावकर यांनी या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष