हेरवाड विकास सेवा सोसायटीच्या १३ जागांसाठी ३२ अर्ज दाखल !

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या येथील हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून एकुण १३ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण ३२ अर्ज दाखल झाल्याचे समजते.

हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एकूण १३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागांसाठी ३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. २१ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर अर्ज माघारीसाठी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च हा कालावधी असणार आहे. अर्ज माघारीनंतर ९ मार्च रोजी चिन्हांचे वाटप व २० रोजी मतदान होणार आहे. दरम्यान अनेक वर्षापासून या संस्थेची निवडणूक बिनविरोध होत आहे. मात्र १३ जागांसाठी ३२ अर्ज आल्याने संस्थेची निवडणूक लागण्याची शक्यता असली तरी माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

------------------------------

गुरु - शिष्यात होणार लढत ?

संस्थेत समानता रहावी तसेच सर्वांना न्याय मिळावा या हेतूने सहा उमेदवारांचे अर्ज दाखल केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य सुकुमार पाटील यांनी सांगितले. दरम्यान सुकुमार पाटील हे निवडणूक रिंगणात उतरल्याने गुरु आणि शिष्याची लढत लागण्याची शक्यता आहे. तसेच माघारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत चर्चेची दरवाजे खुले ठेवली असल्याचेही सुकुमार पाटील यांनी सांगितले. दरम्यान दुसरीकडे गिरीष पाटील यांनी संपूर्ण पॅनेल लावल्याचे समजते त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बिनविरोध निवडणूक होत असलेल्या या संस्थेची निवडणूक लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष