ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक : प्रा. तौहिद मुजावर

 


आलास / शिवार न्यूज नेटवर्क :

आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्षणभंगुर सुखांना बाजूला सारून ध्येयपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. तौहिद मुजावर यांनी केले.

आलास ता. शिरोळ येथील सय्यद सादात एज्युकेशन सोसायटी उर्दू डी टी एड कॉलेज औरवाड व ईशाअतुल उलूम उर्दू हायस्कूल, आलास यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्यासाठी करिअर गाईडन्स प्रोग्रॅम आयोजित केला होता. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा परिषदेचे निरंतर शिक्षणाधिकारी बी.एम. किल्लेदार होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून डाएटच्या अधिव्याख्याता सौ. जाधव होत्या.

 ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट ग्रंथालय, प्रशस्त अभ्यासिका व मार्गदर्शन वर्गाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण लेखी परीक्षेचा सराव केल्यास यशप्राप्ती होऊ शकते यासाठी महाविद्यालयीन जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीची सुरुवात केल्यास पदवीनंतर वेळेचा होणारा अपव्यय टाळता येतो. स्पर्धा परीक्षेची तयारी मधून नोकरीच्या संधी उपलब्ध होतातच तसेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी चालना मिळते. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची जोड देणे आवश्यक असते.


प्रारंभी स्वागत मुख्याध्यापक माजिद पटेल यांनी तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मुर्तुजा पटेल यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार मुर्तुजा पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आभार शकीलअहमद दानवाडे यांनी मानले.

  या कार्यक्रमास नियाजअहमद पटेल, सुलेमान मुजावर, तल्हा पटेल, खंडेराव जगदाळे, तोहिद मुजावर, वसीम जमादार, अफजल पटेल, सर्फराज पटेल, असलम मखमल्ला या मान्यवरांसह पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.


   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष