जयसिंगपुरात हिसडा मारुन तरुणीची चेन लंपास


 जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

मोटार सायकलवरुन आलेल्या चोरट्याने तरुणीच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसडा मारुन लंपास केली. जयसिंगपूर येथील पहिल्या गल्लीत श्रीधर सहनिवास अपार्टमेंटजवळ शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत संजना हेमंत आपटे (वय २३, रा. आपटे भोजनालय, शिरोळवाडी रोड, जयसिंगपूर) यांनी जयसिंगपूर पोलिसात घटनेची वर्दी दिली. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, पहिल्या गल्लीतील श्रीधर सहनिवास अपार्टमेंटजवळ संजना आपटे यांच्या गळ्यातील ३५ हजार किंमतीची सोन्याची चेन चोरट्याने हिसडा मारुन लंपास केली.२५ ते ३० वर्षे वयोगटातील चोरटा हा होंडा सीडी डिलक्स मोटारसायकलवरुन आला होता. अंगाने जाड, केसरी रंगाचा फूल हातोप्याचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरे बूट, काळ्या रंगाची टोपी असे त्याचे वर्णन आहे. त्याने काळ्या रंगाचा मास्क परिधान केला होता. याबाबत संजना आपटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष