रयत संपर्क केंद्र शेतकऱ्यांना लाभदायक - उत्तम पाटील
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
ढोणेवाडी सारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात व दर्जेदार खते मिळावीत या उद्देशाने रयत संपर्क केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यत सर्व शासकीय योजना व सवलतीच्या दरात चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून याचा शेतकऱ्यांना चांगला उपयोग होणार असुन शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
ते ढोणेवाडी व माणकापूर तालुका निपाणी येथे बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रयत सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
यावेळी ढोणेवाडी येथे प्रथमता पूजन करून युवानेते उत्तम पाटील यांच्या हस्ते तर माणकापूरात ग्रामपंचायत अध्यक्षा वैशाली कुंभार उपाध्यक्ष सुनील म्हाकाळे, यांच्या हस्ते रयत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते, प्रकाश सादळकर, राजेंद्र पाटील, राजेंद्र ऐदमाळे, सुमित रोड्ड, प्रवीण पाटील, तैमुर मुजावर, राजू गजरे, सुनिता बंकापूरे, प्रभावती पाटील, व्यवस्थापक आर. टी. चौगुले,
धनपाल नाडगे,तानाजी जाधव ,बाबासाहेब खोत, शिवाजी नागराळे, खानु दुगाणे, महिपती खोत ,दत्ता घाटगे,, मल्लू सदलगे, बाहुबली मेक्कळके, वकील गुळगुळे, तर माणकापूर येथे धनंजय माळी,अभय चौगुले, उत्तम बन्ने,राजु कुंभार, प्रमोद शेवाळे,
सचिन बेडकिहाळे, पिंटू करवते,उत्तम तळपदे, प्रमोद माळी, अमोल बन्ने, वाल्मिकी कोळी,यांच्या सह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा