यशवंत क्रांती संघटनेच्या प्रयत्नामुळे तुंग येथील मेंढपाळांना मिळाली वनविभागाकडून १ लाख २८हजार २५० रुपये नुकसान भरपाई
मिरज / शिवार न्यूज नेटवर्क :
गजानन बाळासो आरगे, प्रकाश रामचंद्र भानुसे, शितल बाबुराव आरगे, रा. तुंग तालुका मिरज जिल्हा सांगली या सर्व मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा तळ गावातीलच बाळकृष्ण पिराजी यादव यांच्या वसंतनगर वसाहतीजवळ कृष्णा नदीच्या बाजूला असणाऱ्या शेतात बसायला होता दि.१७/१२/२०२१ रोजी पहाटे २ ते ३वा. दरम्यान तरसाच्या कळपाने शेळ्या मेंढ्यांसाठी लावलेली वाघर जमिनीच्या बाजूने वाकवून मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला होता.या हल्ल्यात गजानन बाळासो आरगे ९ प्रकाश रामचंद्र भानुसे ७ शितल बाबुराव आरगे ३ शेळ्या जागीच ठार झाल्या होत्या .या हल्ल्याची माहिती मेंढपाळ गजानन आरगे यांनी तात्काळ यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय वाघमोडे साहेब व शिरोळ तालुकाध्यक्ष माननीय श्री दादासो गावडे यांना मोबाईल वरून कळविली होती. माननीय श्री संजय वाघमोडेसाहेब दादासो गावडे घटनास्थळी हजर राहुन हल्ल्याची माहिती मा.श्री.संजय वाघमोडे साहेब यांनी वनरक्षक सोमनाथ थोरवत व पशुसंवर्धन अधिकारी डॉ.पी पी कुलकर्णी यांना फोनवरून कळवुन घटनेचा रीतसर पंचनामा करुन नुकसान भरपाई भरपाई मिळण्यासाठी यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने मा.श्री.संजय वाघमोडे साहेब यांनी सतत पाठपुरावा केला होता सतत केलेल्या पाठपुराव्यास यश येऊन आज दि.२५/२/२०२२ रोजी सकाळी १०.०० वनविभागाच्यावतीने श्री.गजानन बाळासो आरगे ७४२५०/- रुपये प्रकाश रामचंद्र भानुसे ४७२५०/-रुपये शितल बाबुराव आरगे ६७५०/- रुपये अशी एकुण १२८२५०/-(एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे पन्नास रुपये नुकसान भरपाईपोटी वनविभागाकडून देण्यात आले.यावेळी गजानन आरगे,सोमाजी हराळे,शितल आरगे,प्रकाश भानुसे यांनी आम्हाला नुकसान भरपाई हि यशव़ंत क्रांती संघटनेमुळेच मिळाली त्याबद्दल वनविभाग,पशुसंवर्धन विभाग, यशवंत क्रांती संघटनेचे आम्ही आभारी आहोत.व यशवंत क्रांती संघटना आमच्या मदतीसाठी धावून येते.यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संजय वाघमोडे, कोल्हापूर जिल्हा संघटक श्रावण उर्फ पिंटू गावडे, कागल तालुका अध्यक्ष मा श्री संदिप हजारे शिरोळ तालुका अध्यक्ष दादासो गावडे, पत्रकार नवनाथ गावडे,वनपरिक्षेत्र आधिकारी युवराज पाटील, वनपाल तुषार मोरे वनरक्षक सागर थोरवत,वन्यजीव रक्षक अजित पाटील,पशुवैद्यकीय अधिकारी. यशव़ंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी सोमाजी महादेव हराळे दिलीप रामचंद्र भानसे सचिन महादेव हराळे आशितोष भानुसे तुकाराम कापसे मनोज मोहिते वैभव भानुसे दीपक भानुसे सुनील भानुसे तसेच परिसरातील मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा