महावितरण अधिकार्‍यांच्या टेबलवर स्वाभिमानीने सोडला साप


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

 रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारखे जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले होते. राजू शेट्टींनी केलेल्या आवाहनानंतर रात्रपाळीला पाणी पाजवत असताना सापडलेले साप अज्ञात शेतकऱ्यांनी शिरोळच्या तहसिल कार्यालयात सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता. त्यानंतर आज इचलकरंजी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडल्याची घटना घडली आहे.

सरकारने दिवसा वीज देण्याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर, मगर यासारखे प्राण्यापासून शेतक-यांच्या जीवातास धोका आहे त्यामुळे यापुढे सापडलेले जंगली प्राणी या कार्यालयात सोडण्यात येणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी सांगितले. यावेळी अरूण मगदूम, विशाल चौगुले, संपत पवार, श्रीकांत पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष