उद्योगपती संजय घोडावत यांचा ५७ वा वाढदिवस अभिनेते सचिन खेडेकर व अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तर डगमगून न जाता त्यावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. चुकीच्या व्यक्तिपूढे अजिबात झुकू नका पण थोरामोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला नम्र व्हायला हवे. आई वडील हे आपल्या आयुष्यातील प्रथम गुरू आहेत त्यांना कधीही विसरू नका. माझ्या अडचणीच्या काळात माझ्या पत्नीने खंबीर साथ दिली आहे. माझ्या प्रत्येक निर्णयातून माझे कुटुंबीय भक्कम उभे राहिले आहेत. माझे कुटुंबीय, हितचिंतक, ग्रुप मधील सर्व घटक यांच्या जोरावरच आजवर सफल झालो आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती श्री.संजयजी घोडावत यांनी केले . आपल्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सौ.नीता घोडावत, श्री.श्रेणिक घोडावत, सौ. सलोनी घोडावत, विजयचंदजी घोडावत, राजेंद्र घोडावत, आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले '' कोणताही व्यवसाय सुरू केला की पहिल्याच प्रयत्नात यश मिळेलच असे नाही त्यामुळे जिद्द न हारता आपल्या ध्येयाकडे प्रामाणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. सर्वानी आपल्या कामासोबत आरोग्यही जपायला हवे. ग्रुप च्या माध्यमातून आज जवळपास १० हजाराहून जास्त लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला व १६ हजाराहून जास्त विद्यार्थ्यांना आज शिक्षण देण्याचे काम संजय घोडावत विद्यापीठ करीत आहे खरंच आज या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै.सौ सुशीला घोडावत व कै.श्री.दानचंद घोडावत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सचिन खेडेकर व प्राजक्ता माळी यांच्या हस्ते एसजीयु च्या '' उमंग '' या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन ही करण्यात आले यानंतर संपूर्ण कुटुंबीय, मान्यवर, पाहुण्यांच्या समवेत संजय घोडावत यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला.

अभिनेते सचिन खेडेकर आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले ''संजयजी आणि माझी मैत्री फार जुनी आहे. माझ्या यशामध्ये संजयजी चा अप्रत्यक्षरीत्या वाटा आहे कारण त्यांच्याच घरामध्ये मी चिमणी पाखरं या फिल्म चे शूटिंग केले होते आणि ती फिल्म सुपरहिट झाली. संजयजी यांनी सामाजिक टच देऊन ज्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला आहे ही बाब खरचं कौतुकास्पद आहे. यानंतर त्यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या फिल्म मधील डायलॉग म्हणून रसिकांची मने जिंकली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली'' विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा गौरव करून हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याची पद्धत मला आवडली. संजयजी यांनी उद्योग क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. आपल्या कामासोबतच ते आरोग्याला ही महत्व देतात. विद्यार्थ्यांसाठी तेच खरे आयडॉल आहेत. येथे येऊन खूप छान वाटले.

या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोल्हापूर व महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या अभिव्यक्तींचा '' एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये यावर्षी साहित्य क्षेत्रातून सोनाली नवांगुळ, क्रीडा क्षेत्रातून अनुजा पाटील, उद्योग क्षेत्रातून दादू सलगर, शिक्षण व समाजकार्य क्षेत्रातून प्रकाश गाताडे, सामाजिक सेवा क्षेत्रातून संदीप परब यांना ''एसजीयु आयकॉन'' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या सर्व पुरस्काराचे नियोजन व निवेदन प्राचार्य श्री.विराट गिरी यांनी केले.

याचबरोबर शिक्षण क्षेत्रातून संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे संचालक प्रा. श्रीनिवास कोंडुती (वासू सर), उद्योग क्षेत्रातून निलेश बागी, फायनान्स मॅनेजमेंट मधून रवी व जय भागचंदानी, एव्हिएशन क्षेत्रातून कॅप्टन सिमरन तिवाना यांना ''उत्कृष्ट कार्यगौरव'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठाचे सचिव श्री.श्रेणिक घोडावत यांनी आपल्या प्रास्ताविकामधे संजय घोडावत ग्रुप चा प्रगती आलेख वाचून दाखविला. व माझ्या वडिलांनी जी काही प्रगती साधली आहे याचा नेहमीच मला सार्थ अभिमान वाटतो. ग्रुप च्या माध्यमातून येणाऱ्या काही वर्षात आम्ही लोकांना अनेक रोजगार निर्माण करणार आहोत.

या कार्यक्रमास माजी राज्यपाल डॉ.डी.वाय पाटील, आरोग्यराज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, डॉ.सुजित मिणचेकर,राजेश क्ष्रीसागर, करुणा मुंडे, विश्वस्त श्री.विनायक भोसले, श्री.विमल रुणवाल, श्री.राजेंद्र नांद्रेकर, श्री.सुनील शाह, श्री.अतुल शिंदे, कुलगुरु डॉ.अरुण पाटील ,संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी ,प्राचार्य श्री विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर एसजीआय व एसजीयु चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पत्रकार बंधू, संजय घोडावत ग्रुप चे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सप्लायर्स, डिस्ट्रिब्युटर्स, विविध प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, पालक, तसेच घोडावत कुटुंबीय आदींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सोहन तिवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.एस.एम.डिसुझा यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष