कुरुंदवाडमध्ये दारुच्या नशेत एकाला दगडाने जबर मारहाण
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड माळभाग येथील दारू दुकान समोर दारुच्या नशेत दगडाच्या सहाय्याने एकाला पोटावर व छातीवर जबर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पवन कित्तुरे याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जखमी नागेश वडर यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, संशयित आरोपी पवन कित्तुरे व फिर्यादी नागेश वडर हे मित्र असून कुरुंदवाड माळभाग येथे असलेल्या दारू दुकानासमोर पवन कित्तूरे यांने दारूच्या नशेत नागेश वडर याच्याशी वाद घालून दगडाने त्याच्या पोटावर व छातीवर मारहाण केल्याने नागेश हा जखमी झाल्याने त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पवन कित्तुरे याच्यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार विजय घाटगे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा