मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला निषेध


 शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नामदार नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालययाच्या वतीने झालेल्या अटकेचा निषेध नोंदवताना शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरोळ येथे निदर्शने करीत तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला,

यावेळी बोलताना जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषसिंग रजपूत यांनी केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा तिव्र शब्दात निषेध केला, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपा व केंद्र सरकार नाहक त्रास देत आहे असे सांगताना, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न असून देश व राज्यातील वातावरण या मंडळींकडून दूषित केले जात आहे , परंतु महाविकास आघाडीचे सरकार भक्कम असून त्याला कोणताही धोका नाही असेही रजपूत शेवटी म्हणाले,

शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर, शिरोळ विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील प्रमुख उपस्थित होते,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिरोळ तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला,

शिरोळ पंचायत समितीच्या सभापती दिपाली परीट, डॉ. दशरथ काळे, शिरोळ  युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. आण्णासाहेब क्वाणे, रणजीत पाटील, बाबासाहेब बागडी, संदीप बिरनगे, अफसर पटेल, महंमदशफी पटेल, मल्लाप्पा चौगुले, प्रताप उर्फ बाबा पाटील, विजयसिंह माने- देशमुख, शाहीर आवळे, बंडू खराडे, दिलीप बंडगर, पैलवान केशव राऊत, डी.ए. पाटील, हैदरखान मोकाशी, धन्यकुमार सिदनाळे, राजेंद्र घारे, आदिनाथ आरबाळे, आनंदा कुंम्मे, शरद आलासे, बाळासाहेब दिवटे, पोपट भोकरे, अजित थोरवत, अविनाश चौगुले, अण्णासो ककडे, विजय कोळी यांच्यासह शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष