निपाणीत वेश्या अड्ड्यावर छापा; पाच महिलांची सुटका



निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

शहराबाहेरील हॉटेल गोल्डन स्टारवर चालत असलेल्या वेश्या अड्ड्यावर शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून आठ जणांवर कारवाई केली. यामध्ये एका परदेशी महिलेचा समावेश आहे. सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

         हॉटेल गोल्डन स्टार येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार सीपीआय शिवयोगी,शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचला. यावेळ मालक संजय भैरप्पा माळी (वय 35) रा. संकेश्वर,कर्मचारी अरुण जयपाल शेकन्नावर (वय 34) रा.हुकेरी व प्रशांत खंडोबा चव्हाण (वय 35) रा. पिंपळे यांच्यासह पाच महिला मिळून आल्या त्यानुसार सर्वांना ताब्यात घेऊन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने पाच महिलांची बेळगाव येथील महिला सुधारगृहात तर संजय,अरुण व प्रशांत यांना अटक करून पुढील तपास चालविला असल्याची माहिती सीपीआय शिवयोगी यांनी दिली. विशेष म्हणजे यावेळी मिळुन आलेल्या पाच महिलांपैकी कोल्हापूर, गडहिंग्लज येथील चार तर एका परदेशी महिलेचा समावेश असल्याची माहिती शिवयोगी यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष