हेरवाड मध्ये मृतावस्थेत आढळला सांबर जातीचा प्राणी


 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील हेरवाड - मजरेवाडी रोड लगत असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या उसाच्या शेतात मृतावस्थेत सांबर जातीचा प्राणी आढळला. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मृत सांबरचा पंचनामा केला व त्याला तिथेच दफन करण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, हेरवाड - मजरेवाडी रोड लगत बाबासाहेब पाटील यांची शेती आहे. या शेताममध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी सांबर आला होता. या प्राण्यावर दोन दिवसापूर्वी या परिसरातील भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्या सांबरला ठार केल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. यावेळी वन विभागाचे संज्योत शिरोळकर व पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत सांबरचा पंचनामा केला यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यात सदरचा सांबर ठार झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मृत सांबरला जेसीबीच्या सहाय्याने त्या ठिकाणी खड्डा काढून दफन करण्यात आले. 

यावेळी सरपंच सुरगोंडा पाटील, शेतकरी बाबासाब पाटील, अर्जुन जाधव, जितेंद्र कुरुंदवाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान, हेरवाड परिसरात अभयारण्यात आढळणारा सांबर हा प्राणी कोठून व कसा आला ? याबाबतची चर्चा मात्र गावात सुरू आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष