पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांच्या घरी शिवजयंती साजरी
दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, लोक कल्याणकारी राजा शिवछत्रपती हे अखंड देशाचे प्रेरणास्थान असून, अठरापगड जातीच्या लोकांचे संघटन करून स्वराज्य स्थापन करणारे युगप्रवर्तक आहेत. शिवछत्रपतींनी ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. १९ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून सर्वत्र साजरी केली. आज दत्तवाड मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील शिवाजी चौक, दत्तवाड ग्रामपंचायत, शिव गणेश उत्सव मंडळ दत्तनगर या ठिकाणी साजरी करण्यात आली.
त्याचबरोबर दत्तवाड येथील पत्रकार मुन्नाभाई नदाफ यांनी आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब कोकणे, पत्रकार मिलिंद देशपांडे, चंद्रकांत बिरंणगे, बाळासाहेब धुपधाळे, बाळासाहेब कल्लोळे, चंद्रकांत लोहार, हाजी नूरमहंमद नदाफ, अली नदाफ, सलीम मुजावर, नदीम देसाई, विद्याधर कांबळे, रविंद्र कांबळे, त्याचबरोबर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा