हेरवाडमध्ये शॉर्टसर्किटने एक एकर ऊस जळून खाक
| छाया : संग्रहित |
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील जमादार मळा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत आप्पा काशिम जमादार या शेतकर्याचे एक एकर ऊस जळून खाक झाल्याजी घटना घडली आहे. या आगीत या शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दिड वर्षे कष्टाने पिकविलेल्या ऊसाला वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत असताना अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
जळीत क्षेत्रात महावितरणची डिपी असून त्याची अवस्था दुर्देवी झाली आहे. डिपीमध्ये फ्युजाऐवजी तारांचे जाळेच अधिक आहे. खराब झालेल्या केबली तशाच अर्धवट शेतात टाकण्यात आलेल्या आहेत. जीर्ण आणि खराब ताराच फ्युज म्हणून वापरत असल्यामुळे वारंवार लोडशेडिंगमुळे तारा गरम होवून ठिणग्या पडत असतात. मात्र याकडे महाविरण विभागाने दुर्लक्ष केले आहे, आणि याचाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे जळीत उसाची भरपाई महावितरणकडून मिळावी, अशी मागणी या परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी तसेच तलाठी यांनी जळीत उसाचा पंचनामा केला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे 👇 क्लिक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा