राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे छ.शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


तमदलगे / शिवार न्यूज नेटवर्क :

विद्यार्थी शिक्षक प्रबोधिनी जयसिंगपूर ,संचालित राष्ट्रीय विद्यालय तमदलगे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली . छ शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तमदलगे मधील प्रतिष्ठीत नागरिक श्री सुजित पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले .विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेवून त्यांना येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज राहण्याचा उपदेश प्रमुख पाहूण्यांनी दिला. श्री अविनाश पाटील सर यांनी छ शिवाजी महाराजांचे जीवनचरत्र सांगुन विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व दूरदुष्टीकोन मनामध्ये बाळगुन शिक्षण घेण्याचे सांगीतले . यावेळी विद्यालयातील पियुष परीट , नमिता पाटील , श्रेया खाडे , अंजली पाटील व जिज्ञासा पुजारी या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यालयातील सहा शिक्षक श्री काशिनाथ मोहनडुळे सर यांनी व आभार प्रदर्शन सौ वैशाली योगेश तेली मॅडम यांनी मानले . या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष