महसूल कर्मचार्यांच्या संपाला बहुजन समाज पार्टीचा पाठींबा
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य महसुल शासकीय, निमशासकीय संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी 23 व 24 रोजी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपाला बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठींबा दिला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेश कांबळे म्हणाले, महाराष्ट्र राज्य महसुल शासकीय, निमशासकीय संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या या त्यांच्या हक्काच्या असून कर्मचारी, कामगार यांच्या उज्वल भविष्याच्या आहेत, त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बहुजन समाज पार्टी चे अकिल शेख, महादेव मुत्नाळे, राहूल पाटील, विजय कांबळे, प्रदीप कोरवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा