कुरुंदवाड मध्ये स्वाभिमानी आक्रमक

कुरुंदवाडमध्ये शासनाच्या परिपत्रकाची होळी


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 एफआरपीचे दोन तुकडे करून केंद्र  राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.राज्य सरकारने काढलेले परिपत्रक आम्हाला अमान्य असून कारखानदारांची महाविकास आघाडी सरकारमध्ये टोळी निर्माण झाली आहे.सरकारने एफआरपी बाबत तात्काळ निर्णय बदलावा अन्यथा महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब चौगुले यांनी दिला.

     येथील पालिका चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता  एफआरपीचे तुकडे केल्याच्या परिपत्रकाची होळी करून बोंब ठोक आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.

 केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत आहे शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाच्या किमती चे तुकडे करून शेतकऱ्यांना आर्थिक डबघाईला आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संताप शेतकऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

     यावेळी बंडू पाटील, बंडू उमडाळे,रघु नाईक,  योगेश जिवाजे, विश्वास बालीघाटे, पिंटू औरवाडे, प्रमोद चौगुले, शांतिनाथ भबीरे, गौतम पाटील, बाळू मगदूम सह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष