भरतेश पाटील यांचा प्रामाणिकपणा
राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क:
आज काल च्या धावपळीत पण श्री भरतेश पाटील यांच्या सारखी माणसं प्रामाणिकपणा जपत असल्यामुळे अजून ही या जगात माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था अर्जुनवाड शाखेचे कर्मचारी भरतेश पाटील हे सकाळी कामावर येत असताना यांना 5000 रुपये रोख रक्कम घालवाड अर्जुनवाड रोडवर जागो जागी निदर्शनास आली त्यांनी जवळ असणाऱ्या शेजाऱ्यांना साघितलं कि मी कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था अर्जुनवाड शाखेत कामावर आहे ज्याची कोणाची असेल तर त्याला बँकेत पाठवा त्यानंतर संभाजी मगदूम हे शोधाशोध करीत असताना त्यांना बँकेतील कर्मचारी सापडले आहे अशी माहिती देण्यात आली बँकेत संभाजी याने चौकशी केले असता व त्यांना ती रक्कम प्रामाणिक पणे परत केले या प्रामाणिकपणा मुळे भरतेश पाटील यांचे सर्वत्र सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा