जयसिंगपूरात एकावर चाकूने हल्ला
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर येथील राजीव गांधीनगर येथे किरकोळ कारणातून चाकू हल्ला करुन जखमी केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद जखमी रसुल सरताच ईराणी वय 30 रा. रेल्वे स्टेशन रोड जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, जयसिंगपूर येथील राजीव गांधी नगर येथे असगर इजाज इराणी, इन्सान इजाज इराणी, आजम भोला इराणी, अब्बास भोला ईराणी सर्व राहणार राजीव गांधीनगर जयसिंगपूर यांनी जमाव करुन यातील असगर इराणी याने रसुल ईराणी यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर व डाव्या डोळ्याजवळ चाकूने वार करुन जखमी केले. तसेच इतर संशयीतांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार गुरव करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा