संजय घोडावत यांच्या वाढदिवसाच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा अनिश गांधी अजिंक्य


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने संजय घोडावत पॉलिटेक्निक ने संजय घोडावत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य एकदिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या अनिश गांधीने आठपैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले त्याला अजिंक्यपदाचे बक्षीस म्हणून रोख सात हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.अहमदनगरच्या अखिलेश नागरेने सात गुणांसह व सरस टायब्रेक गुण आधारे विजेतेपद मिळविले त्याला बक्षीस म्हणून रोख पाच हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.सात गुण करणाऱ्या मिरजेच्या अभिषेक पाटीलला कमी टाय ब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले त्याला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. अनिकेत बापट (सातारा) व तुषार शर्मा (कोल्हापूर) त्यांचा अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक आला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पॉलिटेक्निकचे प्राचार्य व्ही.व्ही.गिरी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, प्रा.वंदना शहा, स्पर्धा समन्वयक व राष्ट्रीय प्रशिक्षक प्रा.संदीप पाटील व प्रशिक्षक उत्कृष्ट लोमटे इत्यादी उपस्थित होते.

*संजय घोडावत साहेब, सौ नीता घोडावत, श्रेणिक घोडावत, सौ सलोनी घोडावत व विनायक भोसले यांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन सर्व बुद्धिबळपटूना शुभेच्छा दिल्या यावेळी संजय घोडावत यांनी पुढील वर्षापासून या स्पर्धा नियमितपणे मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील असे जाहीर केले.*

या स्पर्धेसाठी एकूण ५१ हजार रुपयांची रोख बक्षिसे व चषक आणि मेडल्स अशी एकूण ५६ बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यापैकी खुल्या गटात २१ बक्षिसे व उत्तेजनार्थ विविध वयोगटात ३५ बक्षिसे होती.

खुल्या गटातील क्रमांक ६ ते २१ चे बक्षिस विजेते पुढील प्रमाणे ६) श्रीराज भोसले, रेंदाळ ७) रविंद्र निकम, इचलकरंजी ८) सोहम खासबारदार, कोल्हापूर ९) प्रणव पाटील, कोल्हापूर १०) मुद्दसर पटेल, मिरज ११) प्रथमेश लोटके, इचलकरंजी १२) प्रवीण सावर्डेकर,चिपळूण १३) संतोष सारीकर, इस्लामपूर १४) मिलिंद नांदले, फलटण १५) श्रेयस घोडके, इचलकरंजी १६) सचिन मोहिते, सातारा १७) राकेश पवार, मुंबई १८) संदीप माने, सांगली १९) चिंतामणी करजगी, चंदगड २०) साद बारस्कर, कोल्हापूर २१) हित बलदवा, जयसिंगपूर

*विविध वयोगट उत्तेजनार्थ बक्षिसे पुढीलप्रमाणे*

*६० वर्षावरील ज्येष्ठ बुद्धिबळपटू*

१) राजू सोनेच्या, सांगली २) भालचंद्र चांदुरकर, मुंबई ३) प्रकाश सोलांकुरकर, कोल्हापूर ४) सुरज पाटील, बेनाडी ५) भारत पाटोळे, निपाणी

*उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू*

१)दिव्या पाटील,जयसिंगपूर २)तृप्ती प्रभू ,कोल्हापूर ३) ईश्वरी जगदाळे, सांगली ४)शर्वरी कबनूरकर, कोल्हापूर ५) अरिना मोदी,कोल्हापूर

*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

१)अपूर्व देशमुख,सातारा २)ऋषिकेश कबनूरकर,कोल्हापूर ३)ओंकार सावर्डेकर चिपळूण ४)आयुष राठोड,सावंतवाडी ५) हर्षल पराल इचलकरंजी

*तेरार्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

१) महिमा शिर्के, कोल्हापूर २) दिशा पाटील जयसिंगपूर ३) अर्थसिद्धेश करापुरकर,म्हापसा गोवा ४) वेदांत दिवाण,कोल्हापूर ५) अरिन कुलकर्णी, कोल्हापूर

*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

१) अभय भोसले,जयसिंगपूर २) आदित्य चव्हाण,सांगली ३) शर्विल येडेकर,सांगली ४) साजिरी देशमुख,सातारा ५) तन्मयी घाटे,सातारा

*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

१) रियार्थ पोद्दार, इचलकरंजी २) विवान सोनी,इचलकरंजी ३) सहर्ष टोकले, रायगड ४) आशिष मोठे,सातारा ५) शौर्य पवार,कोल्हापूर

*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*

१) रिवा चरणकर,सातारा २) समीरा घोडावत,चिपरी ३) ओम नांदले फलटण ४) स्वरूपराज पाटील, सांगली

भरत चौगुले, करण परीट, जयश्री पाटील, उत्कर्ष लोमटे, सूर्याजी भोसले, आरती मोदी व श्रीधर तावडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेसाठी विश्वस्त व्ही.व्ही भोसले, प्राचार्य व्ही व्ही गिरी, स्पर्धा समन्वयक प्रा.एस एन पाटील , व सहकारी प्रा.धीरज पाटील, प्रा. एस व्ही चव्हाण , प्रा.आर एस कट्टी , प्रा.सी एफ राजेमहाडिक, प्रा.व्ही.एस.पावटे,विद्यार्थी समन्वयक वैष्णवी पाटील, केदार दिंडे, तेजस माळी व वैष्णवी सातपुते व सर्व कर्मचारी या सर्वांनी स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष