कुरुंदवाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बोंबठोक आंदोलन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
ईडीसारख्या सूत्राचा वापर करून सरकारमध्ये कारभार करणाऱ्या नेत्यांचे चरित्र हनन करण्याचा घाट भाजपच्या मंडळीने सुरू केला आहे.अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई करून लोक भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. ईडीचा दुरुपयोग करून बदनाम करणाऱ्यांचा निषेध करत असल्याचे माजी नगरसेवक धनपाल आलासे यांनी सांगितले.
येथील पालिका चौकात आज गुरुवारी सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भाजपने ईडीच्या माध्यमातून मंत्री नवाब मलिक यांची चौकशी लावून कारवाई करून त्यांचे चरित्र हनन केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.कार्यकर्त्यांनी बोंब-ठोक करत जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी बाळासो दिवटे, तानाजी आलासे, दिलीप बंडगर, रमेश भूजुगडे, फारूक जमादार, अल्ताफ बागवान, बंडू खराडे, कुदरत भुसारी, हर्षद बागवान. असिफ गोरी, महेश आलासे, शाहीर आवळे, आयुब मानगावे, बबलू बागवान,अकिल गोलंदाज, अजय भोसले आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा