जयसिंगपूरात आरक्षण प्रश्नी रास्ता रोको आंदोलन
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दुसऱ्या दिवशी रास्ता रोको करण्यात आला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.पोलिसांनी हस्तक्षेप करून पेटलेल्या टायरी विझवले व आंदोलकांना शांत केले.
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती राजर्षी शाहू महाराज की जय, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,असा जयघोष करीत शेकडो कार्यकर्ते क्रांती चौकात जमले. चारही बाजूने कार्यकर्त्यांनी वेढा घातला. सगळी वाहतूक थांबवण्यात आली. प्रचंड घोषणाबाजी आणि भगवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.उत्साही कार्यकर्त्याने ती निषेध म्हणून टायर पेटवले. जयसिंगपुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पोलिस कर्मचाऱ्यांसह हस्तक्षेप करीत ते ठेवलेल्या टायरी विझवून काढून घेतल्या. आणि शांततेचे आवाहन केल्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनात माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर, बजरंग खामकर, सागर मादनाईक शंकर नाळे दिगंबर संकट तेजस कुराडे ऋतुराज सावंत देसाई विनायक यादव धनजय दळवी सुधीर खाडे वीरेंद्र निकम यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा