मटका बुकीवर छापा ; तिघांवर गुन्हा दाखल
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दत्तवाड व शिरढोण येथे कल्याण मटका घेताना नूर काले (रा . दत्तवाड) व बाळू यशवंत चव्हाण(रा.शिरढोण, ता.शिरोळ) तसेच बुकी मालक जवाहर पाटील ( रा. कुरुंदवाड) या तिघा विरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 हजार, 980 रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दत्तवाड येथे नूर काळे हा हॉटेलच्या आडोश्यास उघडयावर आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन पैसे घेताना रंगेहात मिळून आला त्याच्याकडून दोन हजार हजार रुपये रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच बुकीमालक जवाहर पाटील या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरढोण येथे इचलकरंजी रस्त्यावर एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बाळू चव्हाण हा पैसे घेऊन आकड्याच्या चिठ्ठ्या देत असताना रंगेहात मिळून आला त्याच्याकडून 1900 रुपये रोख रक्कम व मटक्याची साहित्य जप्त करण्यात आले आहे, ही कारवाई कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तर्फे करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा