महिलांनी आपली भारतीय संस्कृती कायम टिकवून ठेवणे ही काळाची गरज : दत्तात्रय पाटील
गणेशवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :
श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण पतसंस्था खूप सुंदर, व सक्षमपणे वाटचाल करीत असून संस्थेच्या अधिकाधिक प्रगतीसाठी महिलांनी छोट्या मोठ्या उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे.त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे, आपले आरोग्य संतुलित ठेवण्याचे काम महिलांच्या हाती आहे आपल्या अवती भवती अनेक रोगांचे नैसर्गिक औषध आहेत त्याचा उपयोग करावा तर आपल्या शरीरावरील परिधान केलेल्या श्रुंगार हे सुंदर दिसण्याबरोबरच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांची निर्मिती केलीय. यामुळे महिलांनी आपली भारतीय जुनी संस्कृती कायम टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भारतीय संस्कृती आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान देताना प्रसिद्ध व्याख्याते दत्तात्रय राजाराम पाटील यांनी केले.
गणेशवाडी ता शिरोळ येथील श्री भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चावा आठवा वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या प्रांगणात मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर तसेच भारतीय संस्कृती आणि आरोग्य त्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी युवा व्याख्याते पाटील बोलत होते. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक इचलकरंजीच्या अश्विनी वायचळ, सरपंच प्रशांत अपिणे गुरुदत्त साखर कारखान्याचे हेड मॅनेजर सी. डी. पाटील जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वागत संस्थेच्या संचालिका भारती शहापुरे यांनी केल्या. तर प्रस्तावना संगीता बाहुबली खोत यांनी केल्या.
यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ म्हणाल्या महिलानी स्त्रीशक्ती जपणे गरजेचे आहे. महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. परंतु आपल्यावर कुठेही अत्याचार, अन्याय होत असेल तर गप्प बसू नका. त्यासाठी निर्भया पथक असून आमच्याकडे तक्रारी दिल्या तर आम्ही महिला, मुलींना संरक्षण देण्यासाठी अहोरात्र तत्पर आहोत असे सांगितल्या
त्यानंतर अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे चेअरमन सौ वैशाली अशोक वंटे म्हणाल्या संस्थेने लावलेले रोपट्याचे आज वटवृक्ष होत आहे सभासद महिलां, हितचिंतक, खातेदार,ठेवीदार आदी सर्वांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचा सहभाग नोंदवला आहे. प्रत्येकवर्षी संस्था ऑडिट अ वर्ग असून याहीपुढे संस्था सभासदांच्या विश्वासास पात्र राहिल असे सांगून संस्थेचे सविस्तर माहीती विशद केले.
तद्नंतर सरपंच प्रशांत अपिणे, तंजिला मुजावर , सुहासिनी देवताळे, आदींनी मनोगत व्यक्त केले
यावेळी आंतरराज्य बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड पदक मिळवलेले गणेश वास्कर याच्यासह, गावातील सेवा संस्थाचे नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी येथे इचलकरंजीचे डॉ. हेगडेवार रुग्णालय व कणेरीचे सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुषांनी सहभाग घेऊन मोफत तपासणीचा लाभ घेतला
या कार्यक्रमासाठी उपसरपंच जयपाल खोत, गणेश पाणीपुरवठा चेअरमन विजयकुमार गाताडे, दत्त साखर कारखाना संचालक यशवंत माने, दादासो देवताळे, आरोग्य सेवक आर.एच. सनदी, संस्थेच्या संचालिका अर्चना देवताळे, प्रज्ञा
अपिणे, मालूबाई बेळंके, पंकजा माणकापुरे, अलमास जमादार, संगीता अंकलखोप, श्रीमती जयश्री लोंढे, कविता खटावे, सुवर्णा भूशिंगे, शहनाज कोरबु यांचेसह डॉ बाळासाहेब देवताळे, गजानन संस्थेचे चेअरमन मल्लाप्पा अंकलखोपे, वृषभ माणकापूरे, महेश देवताळे, बाहुबली कुचनुरे, रावसाहेब साळुंखे, राजगोंडा पाटील, परशराम गौराजे, शितल माणकापुरेे, सतीश भुशिंगे, संदीप अंखलखोपे, विद्याधर गोरवाडे, बाहुबली खोत, पोपट लोंढे, सचिन खटावे, संतोष देवताळे सह महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अशोक वंंटे यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा