घोसरवाड व कारखाना साईट परिसरात उद्या राहूल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित महारक्तदान शिबिराचे आयोजन
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुदत्त साखर कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कारखाना साईट व घोसरवाड येथील मरगुबाई मंदिरामध्ये उद्या सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त २०२१ मध्ये कारखाना परिसरातील विविध गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरात २०४० हून अधिक जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती. याही वर्षी राहुल घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षभरामध्ये शिरोळ तालुक्यात रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना तसेच कोरोना काळात अनेक रुग्णांना राहुल घाटगे यांच्या माध्यमातून २५० हून अधिक जनाना मोफत रक्त पुरवठा देऊन जीवनदान देण्यात आले. त्यामुळे अनेक जणांना या रक्तदान शिबिराचा मोठा लाभ मिळाला आहे. या वर्षी वाढदिवसानिमित्त शिरोळ . तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, अकिवाट, बस्तवाड, हेरवाड, दत्तवाड, चिंचवाड आदी ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होऊन २२२७ जणांनी आता पर्यत रक्तदान केले आहे. यानंतर उद्या सोमवारी येथील कारखाना साईट व घोसरवाड येथील मरगुबाई मंदिरामध्ये उद्या सोमवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात युवक वर्गासह नागरीकांनी व महिलांचा मोठा सहभाग घेवून सामाजिक कार्याला हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा