दत्तवाड मध्ये हाफ पिच डे- नाईट क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात शुभारंभ
इसाक नदाफ / दत्तवाड :
दत्तवाड (तालुका शिरोळ) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एन.के. चषक २०२२ हाफ पिच डे- नाईट क्रिकेट स्पर्धेचे मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्य यड्रावकर म्हणाले, ग्रामीण भागातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून आपली कला दर्शवण्यासाठी ही स्पर्धा एक व्यासपीठ ठरणार असल्याचे सांगितले. तसेच या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना आपली कला दर्शवण्यासाठी ची संधी निर्माण झाले असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम संघाचे नाणेफेक करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष नूर काले, सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच रूपाली पोवाडी, अनिता कडाके, काशीबाई केंगारे, राखी कोळी, राहुल चौगुले, अभय चौगुले, दौलत माने, सुरेश पाटील, प्रकाश चौगुले, राजगोंडा पाटील, रफिक मुल्ला, मौला नदाफ, लाला मांजरेकर, सतीश वडर, शामराव बिरंणगे, जितेंद्र बिरंणगे त्याचबरोबर एन. के. ग्रुप चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा