कुरुंदवाड : ६० फुटाचा रस्ता झाला ४० फूट...!
कुरुंदवाड येथील रिंग रोड परिसरातील नागरिक झाले आक्रमक
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिकलगार वसाहत ते एस.के. पाटील कॉलज रिंगरोड पर्यंतचा रस्ता नगरपालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. कागदोपत्री हा रस्ता ६० फुटाचा आहे. मात्र, नगरपालिकेने हा रस्ता ४० फुट केले असल्याने उर्वरित २० फुट रस्ता गेला कुठे ? असा सवाल या परिसरातील नागरिकांनी केला असून सध्या बसविण्यात येणारे स्ट्रीट लाईट 60 फूट अंतरावर बसवावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत बोलताना या परिसरातील रहिवाशी सुधीर सरंजामे म्हणाले, प्रभाग क्रमांक आठ कडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले असून या परिसरातील रस्तेही शंकास्पद करण्यात येत आहेत. शिकलगार वसाहत ते एस.के. पाटील रिंग रोड हा रस्ता कागदोपत्री ६० फुटाचा आहे. मात्र केवळ ४० फुटाचा रस्ता नगरपालिकेने केला आहे. मग राहिलेला २० फुट रस्ता गेला कुठे ? असा सवाल उपस्थित करून सध्या चाळीस फुटावरच स्ट्रीट लाईट बसविण्यात येत आहेत. त्यामुळे सदरचे स्ट्रीटलाइट 60 फूट अंतरावर बसवावेत तसेच सन 2004 पासून या परिसरातील गटारी करण्यात आलेल्या नाहीत. सदर गटारी तातडीने कराव्यात अन्यथा कुरुंदवाड नगरपालिकेवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान या पार्श्वभूमीवर बोलताना कृती समितीचे राजू आवळे म्हणाले, भूखंड वाटपाचा विषय ताजा असताना या परिसराचे रोड चाळीस फूट करण्यात आले आहेत, मग वीस फुटाचा रस्ता कोणाच्या घशात गेला ? असा सवाल करून कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
यावेळी राजू आवळे, सुधीर सरंजामे, अर्षद बागवान, विकास पाटील, संजय चव्हाण, रणजीत पाटील, महावीर चौगुले यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा