सासर-माहेरच्या दोन गटात हाणामारी; 38 जणांवर गुन्हा दाखल

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

दत्तवाड ता.शिरोळ येथे मुलीला पळवून नेऊन विवाह केल्याच्या कारणातून सासर-माहेरच्या दोन गटात झालेल्या वादातून सोमवारी रात्री झालेल्या हाणामारी प्रकरणी एका गटातील 24 तर दुसर्‍या गटातील 14 अशा 38 जणांवर येथील पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

          दत्तवाड येथील लता अजितकुमार मटाले(वय47) यांची मुलगी ऐश्वर्या अजितकुमार मटाले हिला जगन्नाथ चव्हाण याने पळवून नेऊन विवाह केला आहे.सोमवारी रात्री 9 वाजता लता मटाले,अजितकुमार मटाले व प्रकाश मटाले हे तिघे चव्हाण यांच्या घरासमोर जावून आमची मुलगी ऐश्वर्या कुठे आहे. ते सांगा त्याचा मोबाईल नंबर तर सांगा असे विचारले असता.

    संशयित आरोपी एकनाथ दत्तात्राय चव्हाण, सुशिला दत्तात्रय चव्हाण, दिनकर राऊ चव्हाण, सचिन दिनकर चव्हाण, पांडूरंग गोविंद चव्हाण,गणेश चव्हाण, केसरकर, रघुनाथ दत्तात्राय चव्हाण,योगेश चव्हाणसह अनोळखी 16 (सर्व रा. दत्तवाड ता. शिरोळ) यांनी संगनमताने जमाव करुन धक्का-बुक्की करत शिवीगाळ केली. व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून प्रकाश मटाले यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

      तर एकनाथ दत्तात्रय चव्हाण (वय 36, रा. काळाम्मावाडी वसाहत दत्तवाड ता. शिरोळ)यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे मटाले यांची मुलगी चव्हाण यांच्या मुलाने पळवून नेल्याचा राग मनात धरून संशयित आरोप काकासो कलगोंडा पाटील,अजित मटाले,अजित मटाले यांची पत्नी अविनाश मटाले,आकाश मटाले,पोपट मटाले,गौरी मिरजे, संभाजी मिरजे, सुनिल पाठराखे व अज्ञात 4 ते 5 जण असे14 जण (सर्व रा. दत्तवाड़ ता. शिरोळ)यांनी संगनमत करत एकनाथ चव्हाण,रघुनाथ चव्हाण,सरिता चव्हाण, एकनाथ चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, सुनंदा चव्हाण यांना आमची मुलगी ऐश्वर्याला आमच्या ताब्यात द्या असे धमकावत शिवीगाळ केली. घरातील प्रापंचिक साहित्य विस्कटून जीवे मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष