स्वाभिमानीने लिटरला सरसकट 5 रुपये वाढ करावे
स्वाभिमानी दूध संघाकडे आंदोलन अंकुशची मागणी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
राज्यातील खाजगी व सहकारी दूध संघाची शिखर संस्था असलेली दुध प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघ यांनी बैठक घेऊन व दूध पावडर व अन्य पदार्थाच्या वाढलेल्या किंमती तसेच दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च विचारात घेऊन 23 फेब्रुवारी 2022 रोजी गायीच्या दुधाचा खरेदी दर 2 रुपये व 13 मार्च 2022 रोजी 3 रुपये असा एकूण 5 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील दुध संघांनी दर देण्यास सुरुवातही केली आहे. आपल्या स्वाभिमानी संघाने 2 रुपये तोही 3:5 फॅट च्या पुढील दुधास वाढविले आहे असे कळते तो पुरेसा नसून खरेदी दर सरसकट 5 रुपये वाढवावा, अशा आशयाचे निवेदन आंदोलन अकुश या संघटनेच्या वतीने स्वाभिमानी दुध संघाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दुध उत्पादक शेतकऱ्यांना आता मिळणारा दर हा न परवडणारा असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे बंद केले आहे आपणाकडून कमी दराने खरेदी सुरु राहिल्यास दुध उत्पादक जनावरे विकून टाकेल त्याचा परिणाम म्हणून लोकांना दुध मिळणार नाही अशी भविष्यात परिस्थिती उद्भवेल आणि भेसळ दुध विक्री वाढून लोकांचे आरोग्य धोक्यात येईल. आज महाराष्ट्रातील व बाहेरील अमूल, हॅट्सन सारखे दुध संघ 33 रुपये दराने गाईचे दुध खरेदी करण्याची तयारी दाखवून या जिल्ह्यात खरेदी करत आहेत आणि आपला संघ मात्र 28 दर देऊन उत्पादकांची लूट करत आहे.
या सर्व बाबीचा विचार करून आपण आजपासून गायीच्या दुध दरात सरसकट प्रति लिटर 5 रुपये वाढ घोषित करावी अशी विनंती आज निवेदन देऊन केली आहे. यावेळी आंदोलन अंकुश चे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, अक्षय पाटील, भूषण गंगावणे, प्रविण माने, महेश जाधव आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा