श्री दत्त शिरोळ येथे सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात
शिरोळ/ शिवार न्यूज नेटवर्क :
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने घेण्यात आलेला सेंद्रीय व जैविक शेती याविषयी शेतकरी मेळावा उत्साहात फार पडला. श्री दत्त पॉलिटेक्निकच्या सभागृहात आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील होते.
सौ. तेजा घोरपडे यांनी मधुमक्षिका पालन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेती व मधुमक्षिकापालन हे एकमेकाला पूरक असून दोन्ही एकाच वेळी शेतकरी करू शकतात हे सांगून या नव्या व्यवसायातून शेतकरी मोठा नफा मिळू शकतात हे उदाहरणासह स्पष्ट केले.
उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, १५ एप्रिल नंतर सेंद्रीय व जैविक शेती तसेच मधुमक्षिकापालन याविषयी दत्त कारखान्याच्या वतीने कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेतीमधून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीची सुपीकता वाढवली पाहिजे. स्वागत व प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाना यांनी केले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक रघुनाथ पाटील, भैय्यासाहेब पाटील, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, माजी संचालक जिन्नप्पा गेंडूगोळ, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, अमर चौगुले, शरद पाटील, प्रा. मोहन पाटील यांच्यासह कारखान्याचे सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा