... नाहीतर स्वाभिमानी उग्र आंदोलन करेल

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

पंचगंगा नदी डिसेंबर महिना चालू झाले की प्रदूषित होण्यास सुरवात होते. कोल्हापूर पासून ते तेरवाड पर्यंत नदीमध्ये जयंती नाला, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गांधीनगर, लक्ष्मी इंडसट्रीयल इस्टेट, काळा ओढा, पार्वती औद्योगिक वसाहत येथील मोठ्या प्रमाणात केमिकल चे पाणी, नगरपालिकेचे मैला मिश्रित पाणी रोज नदीमध्ये विना प्रक्रिया नदीत मिसळते. जलचर प्राणी जसे की मासे वगेरे मरत चालले आहेत. इचलकरंजी सन २०१२ साली काविळ रोगाच्या साथीने ३८ लोकांना जीव गमवावा लागला आहे. मैला मिश्रित पाण्यामुळे पाण्यावर जलपर्णी, केंदाळ तयार होत चालले आहेत. केंदाळ मुळे शेतकरी बांधवांना नदीवरील मोटारी काढताना कसरत करावी लागते. तसेच नदीमध्ये मगरीचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन मोटारी कडे जावे लागते, त्यामुळे नदीतील केंदाळ काढून तेरवाड बंधार्‍याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीने पाटबंधारे विभागाला निवेदनाव्दारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे ज्या वेळी सर्व उद्योग धंदे बंद होते त्यावेळी नदीचे पाणी एकदम स्वच्छ झाले होते याचाच अर्थ असा की नदी हि वरील कारणामुळेच प्रदूषित होत चालली आहे. यासाठी आम्ही गेली २० वर्षे सातत्याने नदी प्रदूषणावर आंदोलन करत आहोत. तरी याबाबत कोणतेही अधिकारी ह्याचे गांभीर्याने विचार करत नाहीत अथवा केले नाहीत. पंचगंगा नदी हि पाठबंधारे खाते च्या अखत्यारीत येते. नदीतील सर्व केंदाळ आपण काढून घ्यावे . तसेच तुम्ही नदी प्रदूषित करणाऱ्या सर्व घटकावर कठोर कारवाई करावी. आणि नाहीतर जर पुन्हा नदीत मासे मेले तर ते मासे आपल्या ऑफिस मध्ये आणून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी. तेरवाड बंधारा वरून ये जा करण्यास भीती दायक झाले आहे कारण बंधारा कमकुवत झाला आहे तसेच बाजूचे कठडे सुध्दा खराब झाले आहेत तेरवाड बंधारा दुरुस्ती साठी ५५ लाख रुपये मजूर आहेत. सदर काम पूर्ण करण्यासाठी आम्ही वारंवार पाटबंधारे खात्याशी संपर्क करत आहोत पण अजून कामास सुरुवात झाली नाही ते काम लवकरात लवकर सुरू करावे तसेच मोठ्या स्वरूपाचे उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. 

यावेळी बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, बंडू उमडाळे, योगेश जीवाजे, पिंटू गौरवाडे, अविनाश गुदले, बाहुबली पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष