सभासदांच्या मनात कपबशी... संस्थेच्या विकासाला मिळणार आणखीण गती : व्हा.चेअरमन वैभव पाटील
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड विकास सेवा सोसायटी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने स्व. सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेलची निर्मिती करून मोठ्या ताकदीने निवडणुकीला सामोरे जात आहेत. गेल्या 40 वर्षांपासून केलेली संस्थेची प्रगती, सभासदांचा वाढता प्रतिसाद आणि सत्ताधाऱ्यांच्यावर असलेला विश्वास या बळावरच आम्ही ही निवडणूक या अगोदरच जिंकली आहे. असा ठाम विश्वास या संस्थेचे व्हा.चेअरमन वैभव पाटील यांनी व्यक्त केला.
गेल्या चाळीस वर्षानंतर प्रथमच हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक लागली असून सत्ताधारी गटाने स्व.सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनलची निर्मिती केली आहे. सत्ताधारी गटाने केलेल्या प्रचाराचा शुभारंभाच्या पहिल्या दिवसापासूनच सभासदांची मोठी फौज या प्रचारात दिसून आली. त्यामुळे ही निवडणूक सत्ताधारीच जिंकणारच असा विश्वास पॅनेल प्रमुखांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान या संस्थेबाबत बोलताना संस्थेचे व्हाईस चेअरमन वैभव पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या काळातच संस्थेची मोठी प्रगती झाली आहे. संस्थेची टोलेजंग इमारत, दोन रेशन धान्य दुकानाच्या माध्यमातून सुरु असलेले धान्याचे वाटप, शेतकर्यांना नियमित कर्ज पुरवठा, पारदर्शी कारभार याच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही संस्थेचा आलेख वाढता ठेवला आहे. इतकेच नव्हे तर सभासदांचा विश्वास संपादन करून आमची वाटचाल सुरु आहे. त्यामुळे या जोरावरच सत्ताधारी गटाला सभासद मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वासही पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा