सागर किटे यांना शिवाजी विद्यापीठामार्फत रसायनशास्त्रात पीएच. डी. पदवी प्रदान
कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
सागर विलास किटे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाच्यावतीने रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी मिळाली. त्यांना शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रोफेसर डॉ. के. एम. गरडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
''सिंथेसिस अँड कॅरॅक्टरायझेशन ऑफ मेटल ऑक्साईड नॅनोकॉम्पोजिट्स सेन्सिटाईझ्ड बाय मेटल चाल्कोजेनाईड अँड देअर ऍप्लिकेशन'' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ. किटे यांनी विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये सात पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी विविध परिषदा व चर्चासत्रात भाग घेतला आहे.
प्रा. डॉ. के. एम. गरडकर यांच्या प्रयोगशाळेत अधिकतम कार्यक्षमतेचा सौरघट बनविला गेला आहे. यामध्ये सौर घटाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांनी महागड्या रंगद्रव्याचा वापर न करता मेटल चॉकोजेनाईड चा वापर केला. रंगद्रव्य मिश्रित सौर घट हे स्थिर नसतात तसेच तेथील रंगांचे कालांतराने विघटन व्हायला सुरुवात होते तसेच त्यासाठी द्रवरूप इलेक्ट्रोलाइट लागतो ज्याच्यामुळे धातूवरती गंज निर्माण होऊन त्यांचा ऱ्हास होतो. व तसेच हे हे रंगद्रव्य अतिशय बागडे असल्याकारणाने हा सोलार घट सामान्य लोकांना परवडत नाही त्यामुळे डॉ.गरडकर व त्यांच्या रिसर्च टीम ने एका वेगळ्या पर्यावरणपूरक पद्धतीने द्रवरूप रंगाऐवजी मॉलिब्डेनम डायसल्फाईड या स्थायू सेमीकंडक्टर चा वापर करून सेन्सिटायझेशन केले व सौर घटाची कार्यक्षमता वाढविली. तयार केलेला सौरघट हा स्थिर स्वरूपाचा असून जास्त काळ टिकणारा आहे. याच बरोबर मॉलिब्डेनम असेल त्याचा वापर करून अतिशय कमी वेळेत ऑरेंज यासारख्या द्रव्याचा सूर्यप्रकाशाच्या मदतीने वीस मिनिटाच्या आत पूर्णपणे त्याचे विघटन केलेले आहे हे विघटन करणे अतिशय गरजेचे असते कारण मिथला ऑरेंज हाती घातक रंगद्रव्य असून मनुष्यप्राण्याला व तसेच वनस्पतींना घातक आहे अशा प्रकारचे बहुउपयोगी संशोधन हे पाहिल्यान्दाच झाल्याने डॉ.डॉ.गरडकर व त्यांच्या रिसर्च टीम चे सर्वत्र कौतुक होत आहे. तयार केलेला सौरघट कुठेही आपण नेऊ शकतो तसेच दुर्गम ठिकाणी सुद्धा अगदी कमी प्रकाशात हा आपली कार्यक्षमता दाखवतो.
डॉ.गरडकर यांच्या प्रयोगशाळेत आजपर्यंत अनेक विविध नॅनो मटेरियल्स तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने झिंक ऑक्साईड , टिटॅनियम ऑक्साईड, गोल्ड आणि सिल्वर नॅनो पार्टिकल्स यांचा समावेश आहे. या नॅनो मटेरियल्सचा उपयोग त्यांनी रंग मिश्रित पाणी शुद्ध करणे, कॅन्सर वरील उपचार तसेच बीज रोपण करण्यासाठी केला आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे कृषी विभागातील महत्वाचे नॅनो मटेरियलचा वापर करून बीज उगवण प्रक्रिया हे शोध कार्य नव्याने सुरू झाले आहे. या नविन तंत्रज्ञानामुळे कृषी उत्पादकता वाढल्याचे दिसून येत असून त्याचा उपयोग शेतकरी बांधवासाठी होणार आहे. आज पर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थी पीएच.डी पूर्ण केलेली असून सध्या आठ विद्यार्थी या विषयावर संशोधन करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा