.... हेरवाडमध्ये अखेर प्रचाराच्या समशेरी म्यान
हेरवाड विकास संस्थेसाठी उद्या मतदान
३३९ सभासद बजावणार मतदान
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क
हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसाटीसाठी गेल्या आठ ते दहा दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून सुरु असलेला प्रचार आज शनिवारी सायंकाळी थंडावला आहे. या काळात सताधारी आणि विरोधी गटाकडून आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पहायला मिळाले. दरम्यान उद्या रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हेरवाड विकास संस्थेच्या सभागृहात मतदान होणार आहे. आणि यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रविवार या दिवशीच उमेवारांचे देव राहणार आहेत.
हेरवाड येथील या संस्थेच्या सभागृहात या संस्थेत मतदान संपन्न होणार आहे. या संस्थेसाठी सत्ताधारी स्व. सत्यापाण्णा बरगाले शेतकरी विकास पॅनेल च्या माध्यमातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत तर विरोधी शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सत्ताधारी गटाचा एक उमेदवार या अगोदर बिनविरोध झाला आहे.
दरम्यान, या संस्थेमध्ये तीन बुथवर मतदान होणार आहे. एका सभासदाला १२ मतदानाचा हक्क असणार आहे. याचबरोबर एकाच वेळी तिन मतदारांना मतदान करणेसाठी सोडण्यात येणार आहे. ४ नंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सहायक निबंधक प्रेमकुमार राठोड यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा