सीनियर नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत हेरवाडच्या भूमिका मोहितेला रौप्यपदक

 


हेरवाड/शिवार न्यूज नेटवर्क :

 ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या ज्युनियर आणि सीनियर नॅशनल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद 2021- 22 च्या स्पर्धेत हेरवाड हायस्कुल हेरवाड ची विद्यार्थिनी कु. भूमिका राजेंद्र मोहिते हिने 55 किलो वजनी गटात रौप्यपदक प्राप्त करून हेरवाड गावाच्या व शाळेच्या कीर्तीत भर टाकून यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदरच्या वेटलिफ्टिंग स्पर्धा 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान ओरिसा- भुवनेश्वर येथे होत असलेल्या या स्पर्धेत भूमिका मोहिते हिने 75 किलो स्नॅच व 95 किलो क्लीन आणि जर्क मध्ये 170 किलो वजन उचलून राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. भूमिका मोहितेच्या यशामुळे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.भूमिकाने दररोज खूप सराव व श्रम घेतल्यामुळेच हे यश तिला प्राप्त झाले. भूमिका ला प्रशिक्षक प्रदिप पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तर साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, संस्थेचे सचिव अजित पाटील,हेरवाड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे , हायस्कूलचे क्रीडाशिक्षक शरद तावदारे व पालकांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष