तेरवाड येथे दोन ठिकाणी दारु अड्ड्यावर छापा
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड ता.शिरोळ येथे लालनगर येथे विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या दोन दारू आड्यावर पोलिसांनी छापा टाकून 22 हजाराचा दारूचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत शहनाज गौस मुल्ला(वय.59), म्हैरुद्दीन नुरुद्दीन जमादार(वय.52,रा.तेरवाड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सायंकाळी 7 वाजता सुमारास संशयित आरोपी मुल्ला याच्या घरी छापा टाकला असता ती घराच्या आडोश्याला पारड्यात विनापरवाना देशी दारू विक्री करत असल्याची रंगेहाथ मिळून आली. या छाप्यात कृष्णा संत्रा देशी दारूच्या बाटल्याचे सात बॉक्स, टंगो पंच कंपनीच्या 98 बाटल्या असा20 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तर संशयित आरोपी जमादार हा देखील घराच्या आडोश्याला दारू विक्री करताना रंगेहाथ मिळून आला.त्याच्याकडून देशी दारु टँगो पंच कंपनीच्या 98 बाटल्या असा 2 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा