मंगराया विकास सेवा सोसायटीसाठी १२ जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात



तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री मंगराया विकास सेवा सोसायटी तेरवाड या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून माघारीनंतर १२ जागेसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. 

 दरम्यान अर्ज माघारीच्या आदल्या दिवशी सत्ताधारी गटाचा अनुसूचित जाती जमाती या गटातून राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड होवून सत्ताधारी गटाने आपले खाते खोलले आहे. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता यावेळी अनेक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी मागे घेतला. व एकूण १२ जागेसाठी  २४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  यानंतर उद्या २५ रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार असून ४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याच दिवशी मतमोजणी संपन्न होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. 

 सोसायटीतील नाराज सभासद निवडणूक रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. उद्या चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून यानंतर प्रचाराला मोठी गती येणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार असून सभासदांचा विश्वास कोण संपादन करणार ? हे येणारा काळच ठरवणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष