जयसिंगपूर येथील इसमाचा विहिरीत बुडून मृत्यू



 जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

कोथळी जैनापूर रोडलगत असलेल्या विहरीत बुडून जयसिंगपूर येथील जालिंदर गोविंद जाधव (वय ४७, रा. रणवीर चौक शाळा नं २ गल्ली नं १३ ) याचा मृत्यू झाला. जैनापूर हद्दीत ही घटना घडली.

साहील आंकुश जाधव (वय २४, रा. रणवीर चौक शाळा नं २ गल्ली नं. १३ जयसिंगपुर ) याने फिर्याद दिली आहे. यातील मयत जालिंदर गोविंद जाधव हे ९ तारखेला रात्री ८ वा. च्या सुमारास बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. जालिंदर हे पाण्यामध्ये बुडुन मयत झाले असून जालिंदरला दारूचे व्यसन होते. तसेच वारंवार दारुच्या नशेत यापुर्वी आत्महात्या करण्याची धमकी देते होते असे वर्दीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार सोमनाथ चळचुक करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष